अवैध गुटखा व अंमली पदार्थांविरुध्द जिल्हा पोलिस ॲक्शन मोडमध्ये

 
as

उस्मानाबाद -  जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थाच्या सेवनामुळे अवैधरित्या विकले जाणारे गुटखा, पान मसाला, गांजा, सुपारी आदींच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी कडक मोहिम जिल्हा पोलिस प्रशासनामार्फत हाती घेण्यात आली आहे. अशा प्रकारच्या अवैध गुटखा व अंमली पदार्थ वस्तूंची विक्री करणारे विक्रेता यांच्यावर पोलिस अधिनियमानुसार तात्काळ गुन्हे दाखल करुन कार्यवाही करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

जिल्हा स्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या आयोजित बैठकीत जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक चे प्रतिनिधी डॉ.एस.डी.चव्हाण, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गणेश बारगजे, सहाय्यक आयुक्त औषधे श्रीकांत पाटील, जिल्हा कृषी अधिकारी प्रतिनिधी डी.बी.दहिफळे, डाक प्रमुख बी.व्ही.पाटील, कुर्डुवाडीचे प्रभारी पोलिस स्टेशन अधिकारी एस.डी.वाघमारे, जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक यासेरोद्दीन काझी आदी उपस्थित होते. जिल्ह्यात आढळणारे अंमली पदार्थाच्या अनुषंगाने शासनाने जिल्हा स्तरावर अंमली पदार्थास आळा घालण्यासाठी तसेच क्षेत्रीय स्तरावरील अंमली पदार्थाबाबतची समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी जिल्हा स्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी कळविले आहे.

From around the web