ढोकी : चोरीच्या मोटार सायकल व पानबुडी पंपासह दोघे आरोपी अटकेत 

 
s

उस्मानाबाद  : ढोकी येथील महादेव चव्हाण उर्फ बापु व पंढरपुर येथील सुरज चव्हाण उर्फ डम्या हे दोघे चोरीच्या वस्तुंचा व्यापार करतात अशी गोपनीय माहीती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाल्याने दि. 27 मार्च रोजी पथकाने नमुद दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याजवळ पो.ठा तुळजापुर गुन्हा क्र. 88/2022 व पो.ठा ढोकी गुन्हा क्र. 78/2022 मधील चोरीस गेलेली मोटार सायकल व पानबुडी पंप आढळला. यावरुन पथकाने त्यांना  मालासह तुळजापुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.                     

चोरीचे चार  गुन्हे दाखल 

उमरगा  : नांगरवाडी फाटा येथील हिताची पेमेंट सर्व्हीसेस प्रा.लि च्या ए टी एम च्या पाठीमागील पत्रा गॅस कटरने वितळवुन  व कापुन आतील 60,000 रुपये रक्कम दिनांक 24 -25 मार्च दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले.अशा मजकुराच्या ए टी एम चालक  शुभांगी सांगवे  यांनी दिनांक 26 मार्च रोजी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 461,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब ;  मोहा येथील नेताजी विर यांच्या बंद घराच्या दरवाज्याची  दिनांक 25-26 मार्च दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडुन कपाटातील 24 ग्रॅम सुवर्ण दागिन्यांसह 70,000 रु रोख रक्कम  अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या नेताजी विर यांच्या  प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 457,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : शिराढोण गावातील तीन दुकानांची कुलुपे दि. 26-27 मार्च दरम्याणच्या रात्री अज्ञात व्यक्तीनी तोडुन चो-या केल्या. यात शंभुराजे मेन्स वेअर मधील प्रत्येकी 30 शर्ट व पॅन्ट, अश्विनी मेडिकल मधील 1,000 रकमेसह एक खोके पेय जल तसेच ताजमहल मल्टि सर्विसेस या दुकानातील 1,000 रकमेसह प्रत्येकी 6 हेडफोन, चार्जर व युएसबी केबल असे साहित्य चोरीस गेले आहे. अशा मजकुराच्या शंभुराजे महाजनयांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 461,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : वडगाव शिवारातील रावसाहेब नवले यांच्या गट क्र. 95 मधील शेत विहीरीतील दोन पानबुडी पंपासह त्याच्या वायर व शेतातील 16 फवारा सिंचन तोटया दि. 27 मार्च रोजी पहाटे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या नवले यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 461,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web