धानोरा : ट्रकने स्कुटरला धडक दिल्याने पती - पत्नी ठार
कळंब : धानोरा (शेळका) ग्रामस्थ- धर्मा बाबु पवार, वय-40 वर्ष हे दि. 26 मार्च रोजी 00.15 वाजता पत्नी– सुरेखा हीला सोबत घेउन स्कुटर क्र. एम.एच. 25 ए 9750 वरुन कळंब – येरमाळा महामार्गाने जात होते. हसेगाव शिवारात ट्रक क्र. एम एच 10 सीआर 1758 च्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे तो ट्रक पवार यांच्या स्कुटरला समोरुन धडकला. या अपघातात पवार पती- पत्नी हे दोघे गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर नमुद चालक घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- विठठल यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279, 304 अ सह मोवाका 184 अंतर्गत् गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : मुर्टा ग्रामस्थ- बब्रुवान थोरात, वय-56 वर्ष हे दि. 27 मार्च रोजी 10.30 वाजता मुर्टा फाटा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजुस उभे होते. यावेळी जळकोट ते नळदुर्ग असा जाणारा मिनी ट्रक क्र. एमएच 17 बीडी 6276 च्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे तो ट्रक थोरात यांना धडकला. या अपघातात थोरात हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर नमुद चालक घटनास्थळावर वाहन सोडुन पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- शिवाजी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279, 304 अ सह मोवाका 184 अंतर्गत् गुन्हा नोंदवला आहे.
लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा आणणा-यावर गुन्हा दाखल
शिराढोण : वीज देयक थकबाकी वसुली करण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ प`थ्वीराज नागटिळक यांसह पथक दि. 27 मार्च रोजी 8.30 वा मंगरुळ गावात फिरत होते. यावेळी गावकरी- तानाजी जाधव यांसह आकाश व सतिष जाधव या पिता-पुत्रांसहीत आकाश जाधव यांनी वीज देयक वसुली कारवाईस विरोध करुन पथकातील लोकांना शिवीगाळ करुन, लाथा बुकयांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली यावरुन नागटिळक यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 353,323,504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.