रुईभरमध्ये  ऑनलाईन CSC सेंटरवाल्याकडून लोकांची फसवणूक 

 
crime

बेंबळी : रुईभर, ता. उस्मानाबाद येथील समीर ईलाही शेख हे आधार, पॅन कार्ड तसेच विविध योजनांचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे काम करतात. गावकरी- धीरज सोमनाथ सातपुते यांनी त्यांच्या वडीलांच्या नावे ‘उध्यम आधार व शॉप ॲक्ट’ चे लायसन काढण्यासाठी वडीलांचे आधार व पॅन कार्ड समीर यांच्याकडे दिले. समीर यांनी त्या आधार व पॅन कार्डच्या सहायाने धनी ॲप या ऑनलाईन कर्ज देणाऱ्या ॲपवर बनावट खाते तयार करुन धीरज यांच्या वडीलांच्या नावे 25,011 ₹ कर्ज घेउन त्या रकमेचा अपहार केला. तसेच गावातील अन्य लोकांकउूनही वेगवेगळ्या कारणासाठी त्यांचे कागदपत्रे धेउन नमूद ऑनलाईन कर्ज देणाऱ्या ॲपवर बनावट खाती तयार करुन एकुण 1,34,744 ₹ रकमेचे परस्पर कर्ज घेउन सर्वांची फसवणूक केली आहे. अशा मजकुराच्या धीरज सातपुते यांनी दि. 06 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 406 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लैंगीक छळ

उस्मानाबाद  - एक 35 वर्षी विवाहित महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 04.05.2022 रोजी 06.00 वा. सु. घरात एकटी असल्याची संधी साधून गावातीलच एका तरुणाने घरात प्रवेश करुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच त्या महिलेस मारहान करुन घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगीतल्यास तीच्याहस तीच्या पतीस ठार मारण्याची धमकी तीला दिली. यावनंतर त्या  तरुणाने तीच्या स्मार्टफोन मध्ये फोनपे ॲप घेउन त्या मार्फत स्वत: च्या बँक खात्यावर 36,000 ₹ परस्पर वळवून त्या महिलेची फसवणूक केली. याचा जाब त्या महिलेने विचारला असता त्याने तीच्या घरातील कपाटाचा आरसा व टीव्ही रिमोट फोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 06 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 323, 506, 420, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 

From around the web