दाऊतपूर :  चोरीच्या मोबाईलफोनसह आरोपी ताब्यात

 
crime

उस्मानाबाद  : दाउतपुर ता.उस्मानाबाद येथील दत्तात्रय क़ष्णा थोरात यांचे राहते घरी दिनांक 09.01.2022 रोजीच्या रात्री  अज्ञात व्यक्तीने दरवाजावरील फटेतुन घरात उतरुन उशाला ठेवलेला रेड मी 8 ए मॉडेलचा मोबाईल चोरुन नेला होता. यावरुन ढोकी पो.ठा. येथे गु.र.क्र. 13/ 2022 हा भा.दं.सं. कलम- 457, 380 यावरुन हा नोंदवण्यात आला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषन शाखेच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि- श्री. रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- पवार, पोना- पठाण, सय्यद, चव्हाण, पोकॉ- आरसेवाड, मोरे, गोरे यांच्या पथकाने नमूद चोरीच्या मोबाईलसह आरोपी- किशोर भगवान वाघमारे, रा. दाऊतपूर, ता. उस्मानाबाद यास आज दि. 2 मे रोजी दाउतपूर परिसरातून ताब्यात घेतले आहे.


मोटारसायकलची चोरी 


मुरुम  : कलदेव निंबाळा, ता. उमरगा येथील शिवहार सतीश पाटील यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 के 272 ही दि. 30.04.2022 ते 01.05.2022 रोजी दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरा समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शिवहार पाटील यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web