सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणेअग्नी प्रज्वलीत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 
crime

 नळदुर्ग  : कुरेशी गल्ली, नळदुर्ग येथील भिमाशंकर बताले व इनामदार गल्ली  येथील सय्यद खातिब हे दोघे दि. 23 जून रोजी 23.30 वा नळदुर्ग बसस्टॅड समोर सार्वजनिक ठिकाणी उघडयावर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन पदार्थ करत असतांना नळदुर्ग पोलीसांना आढळले.

 लोहारा  : लोहारा येथील हर्षद पाटिल हे दि. 23 जून रोजी 22.00 वा.चे सुमारास आंबेडकर चौक येथील फ्रेंडस चायनीज सेंटर समोर घरगुती वापराचे सिलेंडर उघडयावर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन पदार्थ करत असतांना लोहारा पोलीसांना आढळले.

कळंब  : संभाजी नगर, डिकसळ येथील प्रशांत सहाने हे दि.23 जुन रोजी 10.45 वा चे सुमारास कळंब ते परळी जाणारे रोडवर चायनीज सेंटरचे समोर तसेच भिमनगर, कळंब येथील राजाभाउ भिमराव हे 12.30 वा चे सु. कळंब बसस्थानक डेपोकडे जाणारे सार्वजनिक रोडवर उघडयावर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन पदार्थ करत असतांना कळंब पोलीसांना आढळले.

 अंबी : अंबी येथील बबन नाईक व किरण मेहर यांनी  दि.23 जुन रोजी 12.15 वा चे सुमारास अंबी ते अनाळा जाणारे रोडलगत आपआपले हॉटेल समोर तसेच रत्नापुर, परंडा येथील हणुमंत देवकर व किरण सावंत यांनी 16.50 वा चे सुमारास मौजे अनाळा ते रत्नापुर गावात जाणारे सार्वजनिक रोडवरील आपआपले हॉटेल समोर उघडयावर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन पदार्थ करत असतांना अंबी पोलीसांना आढळले.

यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 285 अंतर्गत सबंधीत पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web