सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
उस्मानाबाद : येडशी येथील संतोष देशमुख , राम सस्ते, निलेश लवटे आणि शिंदेवाडी येथील बालाजी देवकर चौघांनी दि.25 जुन रोजी आपापल्या हॉटेल समेारील सार्वजनिक ठिकाणी उघडयावर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन पदार्थ तयार करत असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पोलीसांना आढळले.
येरमाळा : भुम येथील राहुल संदले, साजिद कुरेशी व गणपत काळेकर या तिघांनी दि.25 जुन रोजी 18.50 वा चे सुमारास तेरखेडा बाजार येथे सार्वजनिक जागेत उघडयावर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन पदार्थ तयार करत असतांना येरमाळा पोलीसांना आढळले.
यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 285 अंतर्गत सबंधीत पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.
रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
शिराढोण :- राडी,आंबेजागाई येथील रफिक शेख व धनेगाव, केज येथील शाम राउत या दोघांनी दि. 25 जुन रोजी 18.00 वा चे सुमारास लातुर ते कळंब जाणारे सार्वजनिक रोड आपापल्या ताब्यातील वाहन रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले.
ढोकी : आंदोरा, कळंब येथील सिध्दार्थ बचुटे व ढोकी येथील अच्युत काळे या दोघांनी दि.25 जुन रोजी 21.15 वा चे सुमारास ढोकी पेट्राल पंप येथील मिलन हॉटेल समोरील सार्वजनिक रोडवर आपापल्या ताब्यातील वाहन रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले..
यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरध्द संबंधीत पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.