सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल 

 
crime

उस्मानाबाद  : कळंब येथील आकाश नरुटे, दलपतसिंग राठोड व सुरेश भांडे या तीघांनी दि. 23 मे रोजी 11.00 ते 14.00 वा. दरम्यान कळंब येथे तर जवळा, ता. परंडा ग्रामस्थ- गणेश फोपले यांनी जवळा फाटा येथे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा स्थितीत आपापल्या हातगाड्यावरील गॅस शेगडीवर अग्नी प्रज्वलीत करुन पदार्थ तयार करत असताना पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 285 अंतर्गत कळंब पो.ठा. येथे 3 तर परंडा पो.ठा. येथे 1 गुन्हा नोंदवला आहे.

हाणामारी 

मुरुम  : शास्त्रीनगर तांडा, दाळींब, ता. उमरगा येथील दादाराव राठोड, रामसिंग राठोड, किरण राठोड, वालुबाई राठोड, प्रियंका राठोड या सर्वांनी दि. 23 मे रोजी 08.00 वा. सु. गावकरी- फुलचंद सोमा राठोड यांच्या घरासमोर जाउन झाड तोडण्याच्या कारणावरुन फुलचंद यांसह त्यांची पत्नी- द्रोपताबाई, मुलगी- गंगुबाई व मुलगा- सोमाजी यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीच्या तुंब्याने, लोळण्याने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फुलचंद राठोड यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web