रहदारीस धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्या 9 चालकांवर गुन्हे दाखल

 
crime

मुरुम : 1) अविनाश सुरवसे 2) कमलाकर जवळगे 3) सुनिल चव्हाण, तीघे रा. दाळींब 4) राहुल सोनकांबळे, रा. भोसगा, 5) अप्पाराव फंड, रा. तुगाव 6) साहील शेख, रा. येणेगुर 7) विजय राठोड, रा. शिवाजीनगर तांडा, दाळींब 8) महेश पवार, रा. सुंदरवाडी 9) नागेश्वर खंडागळे, रा. महालिंगरायवाडी या सर्वांनी दि. 25.02.2022 रोजी मुरुम मोड व येणेगुर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर आपापल्या ताब्यातील ऑटो रीक्षा रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द मुरुम पो.ठा येथे स्वतंत्र 9 गुन्हे नोंदवले आहेत.

 
लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

उस्मानाबाद  : अनंत उंकुशराव कवडे हे दि. 25.02.2022 रोजी उसमानाबाद बस आगारात सोलापुर – भुम या बसची तपासणी करत होते. यावेळी पुर्वीच्या वादावरुन अमेश दिलीप पवार, रा. उस्मानाबाद यांसह त्यांच्या सोबतच्या एका अनोळखी पुरुषाने अनंत कवडे यांसह बी.बी. काळे यांना शिवीगाळ करुन चापट, बुक्क्याने मारहान करुन ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी‍ दिली. अशा मजकुराच्या अनंत कवडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 114, 332, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


अपहरण 

उस्मानाबाद  : एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) कुटूंबीयांसह दि. 25.02.2022 रोजी रात्री तीच्या घरात झोपलेली होती. दुसऱ्या सकाळी 06.00 वा. सु. कुटूंबीयास ती अंथरुणावर न दिसल्याने त्यांनी परिसरात व नातेवाईकांकडे तीचा शोध घेतला असता तीच्याबद्दल काही उपयुक्त माहिती न मिळाल्याने अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web