उस्मानाबादेत चोरीच्या मोटारसायकलसह सराईत गुन्हेगार अटकेत

 
s

उस्मानाबाद  :  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी आनंदनगर पो.ठा. चे सपोनि- . चैनसिंग गुसिंगे यांसह पथक उस्मानाबाद शहरात काल दि. 31 जुलै रोजी गस्तीस होते. दरम्याम शहरातील मध्यवर्ती शासकीय ईमारतीच्या आडोशाला एक इसम संशयीतरित्या मोटारसायकलसह आढळला. यावर पोलीसांनी त्याची चौकशी केली असता त्याचे नाव बालाजी विष्णु माने, वय 32 वर्षे, रा. संत गाडगेबाबानगर, परभणी असे असल्याचे समजले. तसेच त्याच्याजवळील मोटारसायकबाबत त्यास विचारपूस केली असता तो मो.सा. ची मालकी- ताबा शाबीत करु न शकल्याने पोलीसांनी त्यास मो.सा. सह ताब्यात घेतले.

 त्या मो.सा. च्या इंजीन व सांगाडा क्रमांकाच्या आधारे पोलीसांनी तांत्रिक तपास केला असता ती मो.सा. परभणी जिल्ह्यातून चोरीस गेल्यावरुन समजले. यावर आनंदनगर पोलीसांनी परभणी पोलीसांशी संपर्क साधला असता बालाजी माने याने ती मोटारसायकल परभणी रेल्वे स्थानक वाहन तळावरुन चोरल्याचे तेथील सीसीटीव्ही फुटेज वरुन सिध्द झाले. तसेच त्याने यापुर्वी परभणी जिल्ह्यात चोरी, जबरी चोरी केल्याने त्याच्यावर 12 गुन्हे दाखल असल्याचे समजले. एकंदरीत बालाजी हा सराईत गुन्हेगार असल्याचे कळताच आनंदनगर पोलीसांनी त्या चोरीच्या मोटारसायकलसह बालाजी यास अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

            सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत व उस्मानाबाद पोलीस उप अधीक्षक- . कल्याण घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनगर पो.ठा. चे पोनि- . तानाजी दराडे, सपोनि-  चैनसिंग गुसिंगे, पोउपनि- श्री. चंद्रशेखर पाटील, पोहेकॉ- ज्ञानदेव कांबळे, चौधरी पोकॉ- नागेश लोमटे, कागदे, गोबाडे, हजारे यांच्या पथकाने केली आहे.

From around the web