उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी, फसवणूक आदी गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : कर्मवीर नगर, उस्मानाबाद येथील ग्रामस्थ- श्याम श्रीधर शिनगारे, वय 51 वर्षे हे कुटूंबीयांसह दि. 07.02.2022 रोजी 04.00 वा. सु. आपल्या घरात झोपलेले होत. यावेळी सात अनोळखी परुषांनी शिनगारे यांच्या घराची कडी तोडून घरात प्रवेश केला. यावेळी श्याम शिनगारे यांना कत्तीने, काठीने मारहान करुन त्यांच्या हातातील 5 ग्रॅम सुवर्ण अंगठी काढून घेतली. तसेच श्याम शिनगारे यांच्या पत्नीस ठार मारण्याची धमकी देउन व कत्तीचा धाक दाखवून घरातील कपाटात असलेले 53 ग्रॅम वजनाच्या सुवर्ण दागिन्यांसह चांदीचे दागिने व 50,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 10,45,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या श्याम शिनगारे यांनी दि. 08 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 395, 397 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 फसवणूक 

उस्मानाबाद  : हडको, तुळजापूर येथील हिरालाल महादेव मोटे यांनी बंदीस्त शेळीपालन व्यवसायाकरीता कर्ज मिळण्यासाठी उस्मानाबाद येथील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ कार्यालय, उस्मानाबाद येथे अर्ज केला होता. या कार्यालयातील लिपीक- बाबासाहेब मारुती थोरात यांनी कर्ज मंजुरी करुन देता असे सांगूण दि. 03.02.2020 पासून आवश्यक कागदपत्रे व शासकीय शुल्क 5,625 ₹ मोटे यांच्याकडून घेतली. तसेच या कर्ज मंजुरीसाठी लिपीक थोरात व त्यांचा मुलगा- सिध्दार्थ यांनी ते प्रयत्न केले असून त्याचा मोबदला म्हणून 5% प्रमाणे 1,25,000 ₹ रक्कम मोटे यांच्याकडून उकळली. यानंतर लिपीक थोरात यांनी कर्ज मंजुरीचे बनावट पत्र मोटे यांना देउन मोटे यांसह अन्य लोकांकडून असे एकुण 2,73,625 ₹ रक्कम घेउन त्यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या हिरालाल मोटे यांनी दि. 08.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 465, 468, 471, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नुकसान

परंडा : लोहारा, ता. परंडा येथील रुपेश ज्ञानदेव गव्हाणे यांच्या कपिलापुरी येथील गट क्र. 67 मध्ये द्राक्ष बाग असून त्या बागेत कपिलापुरी ग्रामस्थ- सुनिल सुर्यभान खांडेकर यांनी दि. 07.02.2022 रोजी 12.30 ते 13.00 वा. सु. पाणी सोडून तसेच बागेतील मांडवाची तानलेली तार तोडल्याने बागेचा मांडव कोसळला. यामुळे गव्हाणे यांच्या द्राख बागेचे अंदाजे 20- 22 लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा मजकुराच्या रुपेश गव्हाणे यांनी दि. 08 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 426, 427, 447 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web