रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 
crime

येरमाळा  : रत्नापुर, ता. कळंब येथील- संतोष वाघमारे व वाशी येथील- रामलखन निसार या दोघांनी दि. 28.11.2022 रोजी 14.40 वा. सु. येरमाळा येथील कळंब रस्त्यावर आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे रीक्षा क्र. एम.एच. 25 एजे 0287 व ॲपे रीक्षा क्र. एम.एच. 25 पी 1911 ही वाहने रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द येरमाळा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

रस्ता अपघात

 नळदुर्ग  : सेवा हरीनगर तांडा, हगलुर, ता. तुळजापूर येथील- बालाजी भिमराव पवार, वय 19 वर्षे हे दि. 26.11.2022 रोजी 19.30 वा. सु. हगलुर शिवारातील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्स 2376 ही चालवत जात होते. दरम्यान तेलंगणा येथील- ताडुरी रमेश पेद्दमल्लया, वय 41 वर्षे यांनी कार क्र. टी.एस. 08 जडी 0069 ही निष्काळजीपने चालवल्याने बालाजी चालवत असलेल्या नमूद मो.सा. समोरुन धडकली. या अपघातात बालाजी हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या देवजी फुलचंद पवार, रा. हगलुर यांनी दि. 28.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web