रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 
crime

 उस्मानाबाद  : सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 10.11.2022 रोजी 06 कारवाया केल्या. यात परंडा ग्रामस्थ- महमद मुजावर, दादा मेहर व विश्वास बोफेफोडे या तीघांनी परंडा शहरातील गोल्डन चौक रस्त्यावर, तर उस्मानाबाद येथील- किसनलाल खारोल व रामचंद्र क्षिरसागर या दोघांनी उस्मानाबाद शहरातील सार्वजनिक रस्त्यावर, तसचे जळकोटवाडी, ता. तुळजापूर येथील- विठ्ठल राठोड यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोहारा येथील रस्त्यावर आपापल्या ताब्यातील वाहने रहदारीस धोकादायकरित्या उभी करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द परंडा पो.ठा. येथे 03, उस्मानाबाद (श.) येथे 02 व लोहारा येथे 01 असे एकुण 06 गुन्हे नोंदवले आहेत.

 
 मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल

 उस्मानाबाद  : मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवणाऱ्यांवर उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 10.11.2022 रोजी 05 कारवाया केल्या. यात आवाडशिरपुरा, ता. कळंब येथील- आप्पासाहेब निगुट व ताडगाव, ता. कळंब येथील- गोविंद जाधवर या दोघांनी शिराढोन येथील लातूर रस्त्यावर, तर वडगाव (मां), ता. केज येथील- नितीन ठोंबरे यांनी होळकर चौक, कळंब येथील रस्त्यावर, तर मुरुम येथील- यशकुमार कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुरुम येथील रस्त्यावर, तर उस्मानाबाद येथील- गणेश लगदिवे यांनी उस्मानाबाद शहरातील तुळजापूर नाका रस्त्यावर आपापल्या ताब्यातील मोटारसायकली मद्यधुंद अवस्थेत चालवून भा.दं.सं. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द शिराढोन पो.ठा. येथे 02 तर कळंब, मुरुम व उस्मानाबाद (श.) पो.ठा. येथे प्रत्येकी 01 असे एकुण 05 गुन्हे नोंदवले आहेत.

अपघातात  एकाचा मृत्यू 

 नळदुर्ग  : पाटील तांडा, खुदावाडी, ता. तुळजापूर येथील- युवराज केशव राठोड, वय 32 वर्षे हे दि. 09.11.2022 रोजी 17.00 वा. सु. जळकोट शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएच 2536 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने कार क्र. एम.एच. 25 एएस 6477 ही निष्काळजीपने चालवल्याने राठोड यांच्या नमूद मो.सा. ला पाठीमागून धडकल्याने मो.सा. अनियंत्रित होउन रस्ता दुभाजकास धडकली. या अपघातात राठोड हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद कारचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- पुष्णा युवराज राठोड यांनी दि. 10.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब), 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web