रहदारिस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्या व चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 
crime

ढोकी : सार्वजनिक रस्त्यावर रहदारिस धोकादायकरित्या वाहने उभे करणाऱ्या व चालवणाऱ्या चालकांवर ढोकी पो.ठा. च्या पथकाने काल दि. 18.11.2022 रोजी 11.00 ते 12.50 वा. दरम्यान कारवाया केल्या. यात 1) बिलाल सौदागर 2) सरताज शेख, दोघे रा. ढोकी 3) बप्पाजी बेडके, रा. गोवर्धनवाडी 4) सदानंद टेकाळे, रा. कोल्हेगाव 5) सर्जेराव लोमटे, रा. देवळाली या सर्वांनी आपापल्या ताब्यातील मोटारसायकल या ढोकी पेट्रोल पंप चौकातील सार्वजनिक रस्त्यावर भरधाव वेगात निष्काळजीपने चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले. तर 6) राजकुमार भोपळे, रा. ढोकी व 7) किशोर देवकते, रा. तेर या दोघांनी ढोकी पेट्रोल पंप चौकातील सार्वजनिक रस्त्यावर आपापल्या ताब्यातील चारचाकी वाहने रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले.   यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द ढोकी पो.ठा. येथे स्वतंत्र 07 गुन्हे नोंदवले आहेत.


मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

 येरमाळा  : येरमाळा येथील- मुकुंद सत्यवान साळुंके हे दि. 18.11.2022 रोजी 16.20 वा. सु. येरमाळा बस स्थानकासमोरी सार्वजनिक रस्त्यावर आपल्या ताब्यातील ॲपे रीक्षा क्र. एम.एच. 25 ए 1464 हा मद्यधुंद अवस्थेत चालवत असताना येरमाळा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन मो.वा.का. कलम- 185 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web