निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 
crime

तामलवाडी :- तामलवाडी ग्रामस्थ- पोपट तानाजी जाधव यांनी दि. 22 जून रोजी 22.55 वा. चे सुमारास आपले ताब्यातील मोटारसायकल तुळजापुर कडुन सोलापुर कडे जाणा-या एन.एच.52 या रोडवर  निष्काळजीपने, बेदरकारपने चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले.

कळंब  :- भाटुंबा, केज येथील बिबिशन भाले यांनी दि. 23 जून रोजी 17.20 वा. चे सुमारास आपले ताब्यातील ॲपे रिक्षा कळंब ते परळी कडे जाणा-या रोडवर तसेच कल्प्नानगर कळंब येथील आकाश धावारे यांनी आपले ताब्यातील ॲपे रिक्षा तांदुळवाडी रोड ते रमाई चौकाकडे जाणा-या रोडवर निष्काळजीपने, बेदरकारपने चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले.

उस्मानाबाद  :- बालाजी नगर उस्मानाबाद येथील व्यंकट पडिले यांनी दि. 23 जून रोजी 17.15 वा. चे सुमारास आपले ताब्यातील ॲटो रिक्षा छ.शिवाजी महाराज चौकाकडुन तेरणा टि पॉईंट कडे जाणा-या रोडवर निष्काळजीपने, बेदरकारपने चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले.

यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द संबंधीत  पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

From around the web