कळंब - मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 
crime

  कळंब -    ऋष्ज्ञीकेश राउत, रा. परतापुर व दत्ता कांबळे, रा. कळंब हे दोघे दि. 12 जून रोजी 22.20 वा. सु. कळंब येथील सार्वजनिक रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत मोटारसायकल चालवत असताना कळंब पोलीसांना आढळले. तर गुंडाप्पा जवळगे, रा. दाळींब हे मुरुम मोड येथील सार्वजनिक रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत मोटारसायकल चालवत असताना मुरुम पोलीसांना आढळले. यावरुने पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द मो.वा.का. कलम- 185 अंतर्गत कळंब पो.ठा. येथे 2 तर मुरुम पो.ठा. येथे 1 गुन्हा नोंदवला आहे.

            तर लक्ष्मण कुंभार, रा. कोल्हेगाव, ता. उस्मानाबाद हे दि. 12 जून रोजी 21.30 वा. सु. ढोकी येथील रस्त्यावर मो.सा. क्र. एम.एच. 25 एयु 3809 ही मद्यधुंद अवस्थेत चालवत असताना ढोकी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 85 (1) अंतर्गत ढोकी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

 
रहदारीस धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

ढोकी : मेघशाम घाडगे, रा. गोवर्धनवाडी, जिलानी शेख, रा. ढोकी व अखिल पठाण, रा. कळंब यांनी दि. 13 जून रोजी ढोकी पेट्रोलपंप चौकातील सार्वजनिक रस्त्यावर आपापली ॲपे मॅझीक वाहने रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द ढोकी पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.


ट्रकची क्रुझरला धडक, १० जखमी 

तुळजापूर  : चालक- जहुर शफी महंमद खान, रा. राजस्थान यांनी दि. 13 जून रोजी 15.30 वा. सु. काक्रंबा शिवारातील रस्त्यावर ट्रक क्र. आर.जे. 43 जीए 5177 हा निष्काळजीपने चालवल्याने शिवाजी बिब्रुवान सुर्यवंशी, रा. अंबुलगा, ता. निलंगा हे चालवत असलेल्या क्रुझर वाहन क्र. एम.एच. 24 सी 8869 ला डाव्या बाजूने धडकला. या अपघातात क्रुझरमधील 10 प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या शिवाजी सुर्यवंशी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web