प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 
crime

उस्मानाबाद  : इंगळे गल्ली, उस्मानाबाद येथील- अमिर सय्यद यांनी दि.22.01.2023 रोजी 14.30 वा.सु. आपल्या ताब्यातील छोटा हत्ती वाहन क्रं. एम.एच.25 पी. 2050 मध्ये पाळीव प्राणी दोन जर्शी गाय अवैध्यरित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून घेऊन जात असतांना उस्मानाबाद शहर पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राण्यांना निर्दयपणे वागणूक कायदा कलम 11 (आय) (डी) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम- 5 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  :फकीरा गल्ली,उस्मानाबाद येथील- फैसल कौसर पठाण यांनी दि.22.01.2023 रोजी 14.30 वा.सु. उस्मानाबाद येथील खिरणी मोहल्ला येथे गौवंशीय जनावरे अवैध्यरित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवलेल्या आसतांना उस्मानाबाद शहर पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राण्यांना निर्दयपणे वागणूक कायदा कलम 11 (एफ) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम- 5 (ब), 9(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मालमत्तेविरुध्द गुन्हे

उस्मानाबाद  : पिपंळगाव डोळा, ता. कळंब येथील- अमृता जगताप ही दि.22.01.2023 रोजी 15.08 वा. सु. उस्मानाबाद बसस्थानक येथे पिपंळगाव  बसची वाट पाहत होती. दरम्यान अज्ञात व्यक्तीने अमृताच्या नकळत तिच्या बॅग मधील  स्मार्टफोन गर्दीचा गैरफायदा घेत चोरून नेला. अशा मजकुराच्या अमृताचे पिता- रमेश जगताप यांनी दि. 22.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : सत्यजीत हनुमंतराव देशमुख रा. ढोकी यांच्या गट क्र. 764 मधील शेतातील विद्युत पंप दि.19-20.01.2023 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरून नेला. अशा मजकुराच्या सत्यजीत देशमुख यांनी दि. 22.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web