उस्मानाबादेत प्राण्यांची वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
crime

उस्मानाबाद  : उस्मानाबाद (श.) पोलीस ठाण्याचे पथक दि. 07 जुलै रोजी 17.00 वा. सु. शहरात गस्तीस असताना वैराग नाका येथील रस्त्यावर पिकअप वाहन क्र. एम.एच. 42 एक्यु 4116 मधून 5 जर्शी गायी दाटीवाटीने भरुन त्यांच्या चारा- पाण्याची व्यवस्था न कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांची निर्दयतेने वाहतूक करत असताना आढळले. यावर उस्मानाबाद (श.) पो.ठा. चे सपोनि- शांतीलाल चव्हाण यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन पिकअप वाहन चालक- ईरफान जब्बार शेख, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांच्याविरुध्द प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम- 11 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 उस्मानाबाद : सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यांवर उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 4 जुलै रोजी कारवाया केल्या. यात नाईकनगर तांडा ग्रामस्थ- सुभाष बन्सी राठोड, शिवाजीनगर तांडा ग्रामस्थ- रवी गोपीचंद राठोड, तुगाव ग्रामस्थ- बादशहा गुलाब मुजावर, दाळिंब ग्रामस्थ- जावेद गफुर बलसुरे आणि मुरुम ग्रामस्थ- समिंदर वसंत देडे या 05 जणांनी मुरुम पोलीस ठाणे हद्दीत तर पाचपिंपळा ग्रामस्थ- विलास विठ्ठल खैरे, परंडा ग्रामस्थ- संभाजी शिवदास माने, राजुरी ग्रामस्थ- सिध्देश्वर संदीपान पाटोळे या तीघांणी परंडा पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक रस्त्यावर आपापल्या ताब्यातील वाहने रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरध्द मुरुम पो.ठा. येथे 5 व परंडा पो.ठा. येथे 3 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

 
निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यावर गुन्हा दाखल

परंडा  : परंडा येथील शकील दस्तगीर शेख यांनी दि. 04 जुलै रोजी छ. शिवाजी महाराज चौक, परंडा येथील स्विट होम दुकानासमोर टेबलावरील शेगडीवर निष्काळजीपने अग्नि प्रज्वलीत करुन पदार्थ तयार करतस असताना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 285 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web