उस्मानाबादेत हाणामारी , दोन जखमी 

 
crime

उस्मानाबाद : जुना बस डेपो परीसरातील ओंकार साळुंके यांच्या घरासमोर दिनांक 31 मार्च रोजी 21.30 वा गल्लीतील शहादद शेख हे मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करत होते. यावर ओंकार व विशाल या दोघा भावांनी त्यास हटकले असता शहादद यासह त्यांची दोन मुले सोहेल व शायद अशा तिघांनी ओंकार व विशाल या दोघा भावांना शिवीगाळ करुन कु-हाडीने, लाथा बुक्यांने मारहाण करुन जखमी केले.अशा मजकुराच्या ओंकार साळुंके यांच्या  प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 324,323,504,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धोकादायकपणे वाहन चालवणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल 

येरमाळा  : येरमाळा पोलीसांचे पथक दिनांक 31 मार्च रोजी 11.45 वा येरमाळा बार्शी महामार्गावर गस्त करत होते. यावेळी  दगडुबा थोरात व दत्ता बांगर हे दोघे चालक टाटा एस प्रकारची  दोन वाहने रहदारीस धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणे, बेदरकारपणे चालवत असल्याचे आढळले. यावरुन पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या दोन प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279 अंतर्गत्‍ गुन्हे नोंदवले आहेत.

अपघातात दोन जखमी 

वाशी : वाडवणा ता.बीड येथील रणजीत यशवंत भोरे हे दिनांक 14 मार्च रोजी  19.30 वा  ईट –आद्रुंड रस्त्याने पायी जात होते. यावेळी आद्रुंड ग्रामस्थ अभिजीत वाघ यांनी  निष्काळजीपणे मोटार सायकल चालवल्याने  भोरे यांना धडकल्याने भोरे हे गंभीर जखमी झाले.  अपघातानंतर नमुद चालक घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या जखमीचा भाउ विश्वास भोरे  यांनी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279, 338 सह  मोवाका 184 अंतर्गत्‍ गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web