शिंगोलीत जुन्या वादावरून दोन गटात हाणामारी
उस्मानाबाद शिंगोली, ता. उस्मानाबाद येथील- प्रसाद शिंदे, अभिजीत शिंदे, बाबासाहेब शिंदे, ओंकार शिंदे, रावसाहेब शिंदे या सर्वांनी जुन्या वादाच्याकारणावरुन दि. 22.12.2022 रोजी 04.30 ते 05.30 वा. दरम्यान शिंगोली शिवारात गावकरी- राकेश शाम शिंदे, मुकेश शिंदे, शशिकांत शिंदे या तीघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. या मारहानीत राकेश यांच्या उजव्या डोळ्याजवळ जखम होउन टाके पडले, मुकेश यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले तर शशिकांत यांच्या डोक्यात गंभीर दुखापत होउन त्याच्या डोक्यास टाके पडले. तसेच नमूद लोकांनी राकेश यांच्या आईसही शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. अशा मजकुराच्या राकेश शिंदे यांनी दि. 23.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 326 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
जुगार विरोधी कारवाई
ढोकी : जुगार विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीसांनी दि. 22.12.2022 रोजी 19.36 वा. सु. हिगंळजवाडी परिसरात छापा टाकला. यावेळी हिगंळजवाडी येथील- बापू पवार, गणेश गोरे हे दोघे गावातील टारजन काळे यांच्या पत्रा शेडसमोर सुरट मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 480 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.