शिराढोण येथे दोन गटात हाणामारी
शिराढोण : शिराढोण, ता. कळंब येथील- उदय बाळासाहेब माकोडे, बाळासाहेब प्रल्हाद माकोडे, चंद्रकांत प्रल्हाद माकोडे या तीघांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 05.09.2022 रोजी 10.00 ते 10.45 वा. सु. शिराढोन येथील मावळा हॉटेल येथे व दयानंद यांच्या गावातीलच मामाच्या घरासमोर गावकरी- दयानंद लक्ष्मण यादव यांसह त्यांच्या भावास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विळा, दगडाने मारहान करुन त्यांना जखमी केले. तसेच ठार मारण्याच्या उद्देशाने नमूद तीघांनी दयानंद यादव यांचा गळा हाताने आवळला व गळ्यातील सुवर्ण लॉकेट काढून घेतले. यावेळी दयानंद यांच्या बचावास आलेले ग्रामस्थ- अभिजीत पाटील यांच्या डोक्यात नमूद तीघांनी अडकीता मारुन त्यांना जखमी केले.
निष्काळजीपने वाहन चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल
येरमाळा : येरमाळा येथील- विनोद रमेश पवार यांनी दि. 12.09.2022 रोजी 12.30 वा. सु. येरमाळा येथील बार्शी रस्त्यावर आपल्या ताब्यातील मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्यु 3760 ही निष्काळजीने, भरधाव वेगात चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.