चिवरी : मनाई आदेश झुगारणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल

 
crime

नळदुर्ग - जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी कोविड- 19 संसर्गाच्या पार्श्वभुमीवर विविध मनाई आदेश जारी केले असून दि. 21.02.2022 ते 23.02.2022 या कालावधीत चिवरी, ता. तुळजापूर येथील महालक्ष्मी  यात्रा रद्द असल्याने मंदीर बंद ठेवण्याबाबतचे आदेश असतांनाही चिवरी ग्रामस्थ- जयपालसिंह मोहनसिंह बायस, शशिकांत देवाप्पा काळजते व बबन देवाप्पा काळजते यांनी ते मनाई आदेश झुगारुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 270, 34 चे उल्लंघन केले. यावरुन ग्रामसेवक- गोरोबा गायकवाड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्या दोन चालकांवर गुन्हे दाखल

मुरुम : बेळंब येथील रत्नदिप सुर्यवंशी व मुरुम येथील विष्णु बनसोडे या दोघांनी दि. 24.02.2022 रोजी मुरुम येथील छ. शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक रस्त्यावर आपापल्या ताब्यातील ऑटो रीक्षा रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द मुरुम पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web