तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात बालकांना भीक मागण्यास प्रवृत्त ,  गुन्हा दाखल

 
crime

तुळजापूर  : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात बालकांना भीक मागण्यास प्रवृत्त करणाऱ्या पाच जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डिकमल पारधी पिढी येथील- गोरख काळे, सुमन काळे, शहाजी काळे, कोंडाबाई पवार, कोंडाबाई काळे व तुळजापूर येथील- उमाबाई शिंदे या सर्वांनी दि. 07.11.2022 रोजी 12.00 वा. सु. तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीर महाद्वारासमोर त्यांच्या 6 ते 12 वयोगाटातील बालकांना येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांकडून भिक मागण्यास प्रोत्साहन देउन त्यांना भिक मागण्यासाठी प्रवृत्त केले. 

यावरुन विस्तार अधिकारी, तुळजापूर- . नागेश वाकडे यांनी दि. 25.11.2022 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द बालकाची काळजी व संरक्षण अधिकनियम कलम- 76 व महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंधक अधिनियम कलम- 11 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लासरा येथे हाणामारी 

 शिराढोण  : लासरा, ता. कळंब येथील- अशोक बन्सी शेळके यांनी दि. 21.11.2022 रोजी 09.45 वा. सु. रांजणी येथील चौकात घारगांव तांडा, ता. कळंब येथील- नामदेव भिमराव राठोड यांना उसणे दिलेले पैसे मागीतले असता नामदेव यांसह त्यांचे पिता- भिमराव व गावकरी- अंकुश चव्हाण अशा तीघांनी पैसे मागीतल्याच्या कारणावरुन अशोक शेळके यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विटाने, चाकुने मारहान करुन गंभीर जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अशोक शेळके यांनी दि. 25.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web