चार हजार लाच घेताना कुमाळवाडी सज्जाचे ग्रामसेवक चतुर्भुज
उस्मानाबाद - गायरान जागेची तक्रारदार यांचे नावे नोंद घेण्यासाठी तसेच घरकुल मंजुरीसाठी दहा हजार लाचेची मागणी करून चार हजार रुपये लाच घेताना कुमाळवाडी सज्जाचे ग्रामसेवक सुयज्ञ वशिष्ठ मैंदाड ( वय 44 वर्षे ) यास एससीबी पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले.
यातील तक्रारदार ( पुरुष,वय- 65 वर्षे ) यांचे राहते घर असलेल्या गायरान जागेची तक्रारदार यांचे नावे नोंद घेण्यासाठी तसेच घरकुल मंजुरीसाठी आरोपी लोकसेवक नामे सुयज्ञ वशिष्ठ मैंदाड यांनी 10,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 4,000/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली होती.
हा सापळा पोलीस निरीक्षक विकास राठोड, पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख ,मधुकर जाधव, विशाल डोके,सचिन शेवाळे यांनी रचला होता.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर 02472 - 222879 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.