आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 
crime

भुम  : वंजारवाडी, ता. भुम येथील श्रीमती पल्लवी सोमनाथ काळे, वय 30 वर्षे यांनी दि. 12 जून रोजी वंजारवाडी येथे विष प्राशन करुन आत्महत्या केली. पल्लवी काळे या आपल्या लहाण बहिणीचे लग्न सोमनाथ काळे यांच्यासोबत लाउन देत नसल्याच्या कारणावरुन सोमनाथ काळे, जगुरास काळे, सुशीला काळे, बबलु काळे, पप्पु काळे, इंदुबाई काळे, सर्व रा. वंजारवाडी, ता. भुम हे मागील काही महिन्यांपासून  पल्लवी यांचा शारिरीक- मानसिक छळ करत होते. या छळास कंटाळुन पल्लवी यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या पल्लवी यांचा भाऊ- सुंदर राजेंद्र शिंदे, रा. बोरगाव (बु.), ता. केज, जि. बीड यांनी अनैसर्गीक मृत्यु क्र. 26 / 2022 फोजदारी प्रक्रीया संहिता कलम- 174 च्या चौकशी दरम्यान दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 498 (अ), 306, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरूममध्ये चोरी 

मुरुम : संभाजीनगर, मुरुम येथील माधव राघवेंद्र देशमुख व त्यांचे भाडेकरु- अरविंद नाईक यांच्या बंद घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 11- 12 जून रोजी दरम्यानच्या रात्री तोडून देशमुख यांच्या घरातील 5,000 ₹ ची चांदीची भांडी व 35,000 ₹ रोख रक्कम तर नाईक यांच्या घरातील लेनोवो कंपनीचा लॅपटॉप व एमआय कंपनीचा कॅमेरा असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या माधव देशमुख यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web