सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल
तामलवाडी : सोलापूर येथील- अरुण बब्रुवान बडुरे व फैजलखान कादीर अहमद या दाघांनी दि. 15.10.2022 रोजी 13.35 वा. सु. तामलवाडी टोल नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे मॅझीक वाहन क्र. एम.एच. 13 सीयु 1866 व पिकअप वाहन क्र. एम.एच. 13 सीयु 4174 ही वाहने भरधाव वेगात निष्काळजीपने चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द तामलवाडी पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यावर गुन्हा दाखल
येरमाळा : शेलगाव, ता. कळंब येथील- सुधाकर नामदेव सरडे यांनी दि. 15.10.2022 रोजी 11.45 वा. सु. शेलगाव येथील आपल्या किराणा दुकानात पेट्रोल हा ज्वलनशिल पदार्थ असल्याचे महित असतानाही व ते मानवी जिवीतास धोकादायक असल्याची जाणीव असताना ते विक्री करण्यास बाळगून भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. यावरुन त्यांच्याविरुध्द येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
लैंगिक अत्याचार
उस्मानाबाद : एका पुरुषाने गावातीलच एका 31 वर्षीय महिलेस (नाव- गाव गोपनीय) लग्नाचे आमिष दाखवून दि. 11.10.2022 रोजी 05.00 वा. सु. तीचे अपहरन केले. तसेच तीला बीड, लातुर, पुणे जिल्ह्यात नेउन वेळोवेळी तीच्यावर लैंगीक अत्याचर केले. तसेच त्या पुरुषाच्या नातेवाईकांनी बंधपत्रावर त्या महिलेच्या सह्या घेउन तीला हाकलून दिले. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 15.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 376 (2) (आर), 376 (2) (एफ), 366, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.