वाशीत मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल

 
crime

उस्मानाबाद  : मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवणाऱ्यांवर उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 22.11.2022 रोजी 03 कारवाया केल्या. यात बनगरवाडी, ता. वाशी येथील- विनोद सलगर हे 18.00 वा. सु. बनगरवाडी ते घाटपिंपरी रस्त्यावर, तर सारोळा (भि.), ता. उस्मानाबाद येथील- अमोल तनमोर हे 19.15 वा. सु. कळंब येथील सार्वजनिक रस्त्यावर, तसेच ढोकी येथील- किरण बनकर हे 21.30 वा. सु. ढोकी बस स्थानकासमोरील रस्त्यावर आपापल्या ताब्यातील मोटारसायकल मद्यधुंद अवस्थेत चालवत असलाना पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द मो.वा.का. कलम- 185 अंतर्गत वाशी पो.ठा., कळंब व ढोकी पो.ठा. येथे प्रत्येकी 01 असे एकुण 03 गुन्हे नोंदवले आहेत.

अपघातात एक ठार 
 
नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील- विशाल जगन्नाथ कुलकर्णी, वय 26 वर्षे हे दि. 06.11.2022 रोजी 23.45 वा. दरम्यान नळदुर्ग ते तुळजापूर रस्त्याने स्कुटर क्र. एम.एच. 25 एएफ 2344 ही चालवत जात होते. दरम्यान अज्ञात चालकाने अज्ञात वाहन निष्काळजीपने चालवल्याने विशाल यांच्या नमूद स्कुटरला समोरुन धडकले. या अपघातात विशाल हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयतेचे पिता- जगन्नाथ कृष्णाथ कुलकर्णी यांनी दि. 22.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब), 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web