उस्मानाबादेत मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल

 
crime

उस्मानाबाद : सार्वजनिक रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 01.01.2023 रोजी जिल्हाभरात 06 कारवाया केल्या. यात गोवर्धनवाडी येथील- अभिजीत वसंतराव लोमटे व कावळेवाडी येथील- सतीश अभिमान काळे हे दोघे 02.00 वा. सु. आपापल्या ताब्यातील अनुक्रमे मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एटी 1999 व मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्स 6870 या ढोकी पेट्रोल पंप चौकातील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवत असताना ढोकी पोलीसांना आढळले. तर कळंब येथील- श्याम शाहू डोंगरे व सचिन सोमनाथ ठानांबीर हे दोघे 00.02 वा. सु. आपापल्या ताब्यातील अनुक्रमे मो.सा. क्र. एम.एच. 25 एयू 5643 व मो.सा. क्र. एम.एच. 25 यवाय 0805 या कळंब येथील सार्वजनिक रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवत असताना कळंब पोलीसांना आढळले. 

तसेच मुरुम येथील- श्रीशैल्य दिनेश अष्टेकर व संदीप मारुती रणसुरे हे दोघे 23.10 वा. सु. आपापल्या ताब्यातील अनुक्रमे मो.सा. क्र. एम.एच. 13 एडब्ल्यू 2442 व मो.सा. क्र. एम.एच. 25 एएच 7574 या मुरुम शहरातील व मुरुम मोड येथील सार्वजनिक रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवत असताना मुरुम पोलीसांना आढळले.  यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द मो.वा.का. कलम- 185 अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 06 गुन्हे नोंदवले आहेत.

 जुगार विरोधी कारवाई

 ढोकी  : जुगार विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीसांनी दि.01.01.2023 रोजी 11.30 वा. सु. ढोकी परिसरात छापा टाकला. यावेळी ग्रामस्थ- खय्युम ईमाम सय्यद हे गावातील पत्रयाचे शेड मध्ये ऑनलाईन जुगार चालवण्याच्या साहित्यासह रक्कम असा एकुण 16,300 ₹ माल बाळगलेले असताना आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web