उस्मानाबाद जिल्ह्यात निष्काळजीपणाचे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
उस्मानाबाद : सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणे, बेदरकारपणे वाहन चालवने, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवने व सार्वजनिक ठिकाणी हातगाड्यावरील शेगडीत, हॉटेलसमोर निष्काळजीपने अग्नि प्रज्वलीत करणे. अशा प्रकरणी उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 10 ऑगस्ट रोजी खालील प्रमाणे कारवाया केल्या.
1) कळंब येथील- सुनिल गायकवाड यांनी कळंब येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत मोटारसायकल चालवून भा.दं.सं. कलम- 185 चे उल्लंघन केले.
2) कळंब येथील- दत्तात्रय सावंत, दिलदार बागवान यांनी कळंब शहरातील सार्वजनिक रस्त्याकडेला आपापल्या हातगाड्यांवरील शेगडीत तर मलकापुर येथील महादेव शिंदे, आप्पासाहेब जगताप यांनी येडेश्वर मंदीर परिसरातील आपापल्या हातगाड्यांवरील शेगडीत तसेच शेखापुर येथील सतिश नलवडे यांनी परंडा पो.ठा. हद्दीतील आपल्या हॉटेलसमोरील गॅस शेगडीत निष्काळजीपने अग्नि प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले.
3) उमरगा ग्रामस्थ- राजेंद्र इंगळे, माडज ग्रामस्थ- ज्ञानोबा गायकवाड, शिवाजीनगर तांडा ग्रामस्थ- पिन्टु चव्हाण, तुरोरी तांडा ग्रामस्थ- अमित राठोड, येणेगुर ग्रामस्थ- अभिमन्यु साळुंके या सर्वांनी आपापली वाहने उमरगा पो.ठा. हद्दीत व सोनारी ग्रामस्थ- आशीफ तांबोळी, चिंचपुर ग्रामस्थ- विजय जगदाळे यांनी आपापली वाहने अंबी पो.ठा. हद्दीत आणि तडवळा (क.) ग्रामस्थ- बाबा पवार, येरंडवाडी ग्रामस्थ- राजकुमार कांबळे यांनी ढोकी पो.ठा. हद्दीत तर मुरुम ग्रामस्थ- महेबुब मणियार, सिराज नदाफ, सुंदरवाडी ग्रामस्थ- बाबासाहेब बनसोडे यांनी मुरुम पो.ठा. हद्दीत तसेच लोहारा (बु.) ग्रामस्थ- बबन कुरकुले, करजगांव ग्रामस्थ- कुमार गायकवाड यांनी लोहारा पो.ठा. हद्दीत तर जहागीरदारवाडी ग्रामस्थ- रवि चव्हाण यांनी उस्मानाबाद शहर पो.ठा. हद्दीत आणि उस्मानाबाद ग्रामस्थ- असीफ शेख यांनी बेंबळी पो.ठा. हद्दीत सार्वजनिक रस्त्यांवर आपापली वाहने रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले.
4) सोलापूर येथील सुनिल कोटा व राहुल भोसले या दोघांनी तामलवाडी पो.ठा. हद्दीतील महामार्गावर तर उस्मानाबाद येथील महेश बोराडे यांनी उस्मानाबाद शहर हद्दीत सार्वजनिक रस्त्यावर आपापली वाहने जिवीतास धोकादायकरित्या, निष्काळजीपने चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले.
यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द संबंधीत पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.