उस्मानाबाद जिल्ह्यात मद्यपी चालकांविरुध्द गुन्हे दाखल

 
crime

उस्मानाबाद : मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 20.09.2022 रोजी 5 कारवाया केल्या. यात सोनारवाडी ग्रामस्थ- सुखदेव त्रिंबक जाधवर व कळंब ग्रामस्थ- दत्ता बबनराव मदने हे दोघे 18.21 व 20.51 वा. सु. कळंब शहरातील सार्वजनिक रस्त्यावर अनुक्रमे एक विना नोदणी क्रमांकाची मोटारसायकल व मो.सा. क्र. एम.एच. 25 एई 8352 या मद्यधुंद अवस्थेत चालवत असताना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले. 

तर मुरुम येथील- प्रविध फुलचंद माळी व पाशा अब्दुलसाब कुरेशी हे दोघे 21.30 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुरुम येथील रस्त्यावर अनुक्रमे मो.सा. क्र. एम.एच. 25 एएफ 4158 व मो.सा. क्र. एम.एच. 25 के 1853 ही मद्यधुंद अवस्थेत चालवत असताना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले. तसेच ढोकी येथील- तानाजी शिवाजी विर हे 21.30 वा. सु. ढोकी पेट्रोल पंप चौकातील रस्त्यावर मो.सा. क्र. एम.एच. 25 एपी 2340 ही मद्यधुंद अवस्थेत चालवत असताना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले.  यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द मोटार वाहन कायदा कलम- 185 अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 
रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 परंडा  : चिखलठाणा, ता. करमाहा, जि. सोलापूर येथील- करण काशीनाथ मराळ यांनी दि. 20.09.2022 रोजी 18.30 वा. सु. परंडा येथील करमाळा रस्त्यावर ॲपे मॅझीक वाहन क्र. एम.एच. 45 एएफ 7308 हे रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन परंडा पो.ठा. चे पोलीस अंमलदार- साधु शेवाळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web