लोकसेवकास धक्का बुक्की करणा-यास सहा महिने कारावासाची शिक्षा

 
crime

वाशी : लोकसेवकास त्याच्या शासकीय कर्तव्यापासुन जानिवपुर्वक पराव्`त्त करण्याच्या उददेशाने धक्का –बुक्की केल्याबददल वाशी येथील श्रीधर हणुमंत चेडे यांच्याविरुध्द वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 55/2015 दाखल होता. या सत्र खटला क्रमांक 47/2019 चा निकाल वाशी येथील अति सत्र न्यायाधीकश क्रमांक 2 मा. श्री. देशपांडे यांच्या न्यायालयात दिनांक-08 मार्च रोजी जाहीर झाला. यात भा.द.सं कलम 353 च्या उल्लंघनाबददल 6 महिने साध्या कारावासाच्या शिक्षेसह 2000 रु दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 
अंबी  : अंतरवली ता.भुम येथील अर्जुन व क`ष्णा जाधव या दोघां पिता-पुत्रांना न्यायालयाने मारहानीच्या खटल्यात जामीन मुक्त केले होते. या जामीनातील अटिंचा भंग करुन ते दोघे न्यायालयीन सुनावनीस टाळत असल्याने न्यायालयाने त्यांचे अटक वारंट काढले होते. तरीही त्यांनी न्यायालयात सुनावनीस हजर राहण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ केली. यावरुन पोलीस हवालदार दिलीप धावडे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं 229 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web