भूम : खूनाच्या गुन्ह्यातील सात आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा

 
court

भूम : तालुक्यातील वाकवड येथील एकाचा खून केल्या प्रकरणी भूम येथील सत्र न्यायालयाचे अतिरीक्त सत्र न्यायाधीश वडणे यांनी आजन्म कारावास आसह आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, भूम तालुक्यातील वाकवड येथील सचिन व तुकाराम विक्रम येळे, राजेंद्र व हनुमंत महादेव येळे, महादेव लिंबा येळे, विक्रम नामदेव येळे व अंकुश सोमनाथ येळे या सर्वांच्या विरुध्द भूम पोलिस ठाण्यात खूनासहीत खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा क्र. २१७ / २०१८ नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक एम.बी. सुर्यवंशी यांनी करुन भूम येथील सत्र न्यायालयात खटला क्र. ८ / २०१९ हा दाखल केला होता.
या खटल्याची सुनावणी अतिरीक्त सत्र न्यायाधीश क्र.१ वडणे यांच्या न्यायालयात होऊन दि. ८ फेब्रुवारी रोजी अंतीम निकाल जाहीर झाला. यात उपरोक्त सर्वांना खालीलप्रमाणे शिक्षा सुनावण्यात आल्या असून त्या सर्व शिक्षा समवर्तीपणे भोगावयच्या आहेत.

 खून करणे भादंसं कलम ३०२ नुसार आजन्म कारावासासह प्रत्येकी २ हजार दंडाची शिक्षा तर‌ खूनाचा प्रयत्न करणे भादंसं कलम ३०७ नुसार आजन्म कारावासासह प्रत्येकी १ हजार ₹ दंडाची शिक्षा व मारहाणीत गंभीर दुखापत करणे भादंसं कलम ३२४ नुसार ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा. तसेच मारहानीत साधी दुखापत करणे भादंसं कलम- ३२३ नुसार १ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा. तर ठार मारण्याची धमकी देणे भादंसं कलम ५०६ नुसार २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व अवैध जमाव प्रकरणी भादंसं कलम १४१ नुसार ६ महिने सश्रम कारावास. भादंसं कलम १४७ मध्ये २ वर्षे सश्रम कारावास, भादंसं कलम १४८ नुसार ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
 

1) खून- भा.दं.सं. कलम- 302 मध्ये आजन्म कारावासासह प्रत्येकी 2,000 ₹ दंडाची शिक्षा.

2) खूनाचा प्रयत्न- भा.दं.सं. कलम- 307 मध्ये आजन्म कारावासासह प्रत्येकी 1,000 ₹ दंडाची शिक्षा.

3) मारहानीत गंभीर दुखापत करने- भा.दं.सं. कलम- 324 मध्ये 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.

4) मारहानीत साधी दुखापत करने- भा.दं.सं. कलम- 323 मध्ये 1 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.

5) ठार मारण्याची धमकी देने- भा.दं.सं. कलम- 506 मध्ये 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.

6) अवैध जमाव प्रकरणी- भा.दं.सं. कलम- 143 मध्ये 6 महिने सश्रम कारावास. भा.दं.सं. कलम- 147 मध्ये 2  

     वर्षे सश्रम कारावास, भा.दं.सं. कलम- 148 मध्ये 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

From around the web