भूम : भूखंडाच्या मालकी हक्काच्या कारणावरुन एकास बेदम मारहाण
भूम : शाळु गल्ली, भुम येथील- तौफीक सत्तार कुरेशी हे दि. 05.11.2022 रोजी 20.00 वा. सु. गावातील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी गराडा गल्ली, भुम येथील- अमजद कुरेशी, अलीशेर कुरेशी, फारुख कुरेशी, फुरखान कुरेशी, सुलतान कुरेशी, आदिफ कुरेशी यांसह चार- पाच व्यक्ती या सर्वांनी तौफीक कुरेशी यांना अडवून भुखंडाच्या मालकी हक्काच्या कारणावरुन तौफीक यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन त्यांना गंभीर जखमी केले. तसेच फुरखान कुरेशी यांनी ठार मारण्याच्या उद्देशाने तौफीक यांच्यावर धावून जाउन त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच यावेळी तौफीक यांच्या बचावास आलेला त्यांचा भाऊ- नजीर यांसही नमूद लोकांनी मारहान केली. अशा मजकुराच्या तौफीक कुरेशी यांनी दि. 08.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 323, 324, 341, 143, 147, 148, 149, 504, 506 सह आणि शस्त्र कायदा कलम- 4,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 135 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
ट्रॅक्टरचे चाक पायावरून गेल्याने एकजण गंभीर जखमी
ढोकी : ढोकी येथील- हरिश्चंद्र शिवराम शिंदे, वय 50 वर्षे हे दि. 07.11.2022 रोजी 22.00 वा. सु. पेट्रोल पंप चौक, ढोकी येथील रस्त्याने जात असताना अज्ञात चालकाने ट्रॅक्टर क्र. एम.एच. 43 बीपी 6975 हा निष्काळजीपने चालवल्याने हरिश्चंद्र शिंदे यांना पाठीमागून धडकल्याने त्यांच्या उजव्या पायावरुन ट्रॅक्टरचे चाक जाउन पायाचे हाड मोडून ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या हरिश्चंद्र शिंदे यांनी दि. 08.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.