भूम :  फेसबुकवर बदनामीकारक मजकूर टाकणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल 

 
crime

भूम  : संजय करे नावाच्या फेसबुक खातेदाराने दि. 23.04.2022 रोजी  10.45 वा. सु. भुम येथील अनिकेत पोपट टिपे यांच्या फेसबुकवरील खात्याला टॅग करुन अनिकेत यांच्याविरुध्द बदनामीकारक मजकुर टाकून तसेच अन्य एकास अश्लिल शिवीगाळ केली. अशा मजकुराच्या अनिकेत टिपे यांनी दि. 24 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 499, 500, 504, 506, 292 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 67 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 फसवणूक 

ढोकी : शिव ड्रिलर्स, कंपनी 27/1 रविंद्रा सारणी, कोलकत्ता या कंपनीतर्फे ठेकेदार- उदयन बॅनर्जी, नवरतन डागा, मनिष पांचाशी, रा. कोलकत्ता यांनी तेर येथील- महादेव भागवत खटावकर यांना सिमेंट बंधाऱ्याचे सब डिलर्स नेमूण त्यांच्याकडून सन- 2019 ते 24.04.2022 या कालावधीत तेर, ढोकी, ढोराळा, कावळेवाडी या ठिकाणच्या बंधाऱ्याची एकुण 40,64,181 ₹ रकमेची कामे करवून घेतली. नमूद कंपनीच्या ठेकेदारांनी त्यातील उर्वरीत रक्कम 18,64,181 ₹ रक्कम आज पर्यत खटावकर यांना न दिल्याने महादेव खटावकर यांनी वेळोवेळी फोनद्वारे त्यांना संपर्क साधला असता त्यांना नमूद ठेकेदारांनी टाळले. यावर खटावकर यांनी येडशी येथील नमूद कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करता ते कार्यालय बंद करण्यात आल्याचे समजले. अशा मजकुराच्या महादेव खटावकर यांनी दि. 24 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 406, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web