भातागळी : कौटुंबीक वादावरुन एकाचा खून 

 
crime

लोहारा  : भातागळी, ता. लोहारा येथील गणेश माने, दस्तगीर शेख, चाँदपाशा शेख या तीघांनी कौटुंबीक वादाच्या कारणावरुन दि. 25.02.2022 रोजी 21.00 वा. सु. कास्ती (बु.) शिवारात गावकरी- अक्षय जयवंत जगताप उर्फ रावसाहेब, वय 25 वर्षे यांस मारहान करुन त्यांचा खून केला आहे. अशा मजकुराच्या जयवंत राजाभाउ जगताप यांनी दि. 03.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहान

वाशी  : शेंडी, ता. वाशी येथील हिराबाई पवार, मिराबाई चौगुले, करण पवार, आशाबाई दळवे, संजय चौगुले, प्रदिप दळवे, अविनाश या सर्वांनी दि. 03.03.2022 रोजी 05.30 वा. सु. गावकरी- प्रयागबाई शिंदे यांच्या घरात घुसून कौंटुंबीक वादाच्या कारणावरुन प्रयागबाई यांसह त्यांची मुलगी- सिमा, मुलगा- शत्रुघ्न, पुतन्या- प्रकाश, नातु- ओंकार व अविष्कार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच 10,000 ₹ व दोन स्मार्टफोन हिसकावून घेउन गेले. अशा मजकुराच्या प्रयागबाई शिंदे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 327, 323, 504, 506, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web