खबरदार !  आक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कडक कारवाई होणार - पोलीस अधीक्षक 

 
osmanabadsp

उस्मानाबाद -  फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विीटर, व्हॉट्सॲप इत्यादी सामाजिक प्रसार माध्यमांवर पोलिसांकडून देखरेख करण्यात येत असुन सर्व सामाजिक प्रसार माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.दोन समाजांत तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कडक कारवाई करण्याचे संकेत  पोलीस अधीक्षक अतुल विकास कुलकर्णी यांनी दिले आहेत. 


उस्मानाबाद जिल्हा हा अत्यंत शांतताप्रिय असुन सामाजीक सलोखा राखणारा जिल्हा आहे. नजीकच्या काळात सामाजीक तेढ निर्माण करणाऱ्या घटनेतून जिल्ह्यातील नागरीकांनी स्वत:ला वेगळं ठेवून त्यांचा सामंजसपणा व सामाजीक सलोखा दाखवीलेला आहे. सद्यस्थितीत सुरु असलेल्या जातीय घडामोडी संदर्भाने सुध्दा आपणाकडून सहकार्याची अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की,  कोणीही कोणत्याही समाजाच्या भावना दुखविणारे, तसेच भडकावू किंवा जिल्ह्यातील शांतता भंग करणे किंवा दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असे अक्षेपार्ह संदेश, छायाचित्रे, छायाचित्रीकरण अशा माहितीची शहानिशा न करता सामाजीक प्रसार माध्यमांवर ती माहिती प्रसारीत करु नये.

            उस्मानाबाद पोलीस दलामार्फत फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विीटर, व्हॉट्सॲप इत्यादी सामाजिक प्रसार माध्यमांवर देखरेख करण्यात येत असुन सर्व सामाजिक प्रसार माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. सामाजिक प्रसार माध्यमांवरुन विवादीत माहीती प्रसारीत करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आपण सर्वांनी उस्मानाबाद जिल्ह्यात शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस दलास सहकार्य करावे. असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातर्फे  पोलीस अधीक्षक अतुल विकास कुलकर्णी यांनी जनतेस केले आहे.

From around the web