सांजामध्ये शेतजमीनीच्या मालकी हक्काच्या कारणावरुन मारहाण 

 
crime

उस्मानाबाद  : प्रसाद कॉलनी माणिक चौक, उस्मानाबाद येथील- शिवाजी काका पवार, वय 50 वर्षे हे त्यांची पत्नी- उषा हिच्यासह दि. 14.12.2022 रोजी 10.00 वा. सु. सांजा गट क्र. 590 मधील आपल्या शेतात शेतबांध फवारण्यासाठी गेले होते. यावेळी सांजा ग्रामस्थ- संजय व रणजित सुभाष सुर्यवंशी या दोघा भावांसह सतिश लक्ष्मण सुर्यवंशी यांनी तेथे जाउन शेतजमीनीच्या मालकी हक्काच्या कारणावरुन शिवाजी पवार यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. यावेळी शिवाजी यांची पत्नी- उषा यांनी सदर घटनेचे आपल्या मोबाईल फोनद्वारे छायाचित्रन करत असताना रणजित यांनी त्यांचा मोबाईल फोन हिसकावून फोडला. तसेच संजय व रणजित यांनी शिवाजी यांच्या पिशवीतील विषारी औषध काढून शिवाजी यांना जबरदस्तीने पाजून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या  शिवाजी पवार यांनी दि. 15.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 323, 427, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंबमध्ये अपघातात एक ठार 

 कळंब  : अंजनडोह, ता. धारुर, जि. बीड येथील- महेबुब निजाम पठाण, वय 32 वर्षे हे दि. 14.12.2022 रोजी 16.30 वा. सु. कळंब येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 44- 3494 ही चालवत जात होते. यावेळी सात्रा, ता. कळंब येथील- बालाजी शिंदे यांनी पिकअप वाहन क्र. एम.एच. 24 जे 9054 हा भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने महेबुब पठाण हे चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला पाठीमागून धडकला. 

या अपघातात महेबुब यांच्या डोक्यास गंभीर मार लागून ते मयत झाले. या अपघातानंतर नमूद पिकअप चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचे पिता- निजाम हबीब पठाण, रा. अंजनडोह यांनी दि. 15.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब), 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web