स्मार्ट फोन हाताळताना सावधान ! ऑनलाईन होऊ शकते फसवणूक ...
लोहाऱ्यातील एकाची दोन लाखाची फसवणूक
Thu, 11 Aug 2022

लोहारा - लोहारा तालुक्यातील चिंचोली काटे येथील संदीपपान शिवाजी सूर्यवंशी यांची एका अज्ञात आरोपीने दोन लाखाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
यातील प्रथम खबरी- संदिपान सुर्यवंशी हे शिंगणापुर (शिखर) ते चिंचोली (काटे) असा प्रवास बसने करत असताना त्यांनी आपल्या स्मार्टफोनमधील युपीआय प्रणाली हातळल्याचे बसमधील अज्ञात व्यक्तीने पाहुन यानंतर त्या व्यक्तीने गर्दीचा फायदा घेउन सुर्यवंशी यांचा स्मार्टफोन चोरला. यानंतर त्या व्यक्तीने सुर्यवंशी यांच्या स्मार्टफोनमधील युपीआय प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यातील 2,00,000 ₹ रक्कम ऑनलाईन पध्दतीने अन्य खात्यात स्थलांतरीत केली. अशा मजकुराच्या संदिपान सुर्यवंशी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 419, 420 सह आयटी ॲक्ट कलम- 66 नुसार गुन्हा नोंदवला आहे.