बेवारस आढळलेल्या 128 मोटारसायकलचा लिलाव 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : गेल्या काही वर्षात उस्मानाबाद (श.) पोलीसांना हद्दीमध्ये अनेक मोटारसायकल बेवारस स्वरुपात आढळल्या होत्या. त्यातील बहुतांशी मोटारसायकल या अत्यंत जुन्या असल्याने त्यांचा सांगाडा, इंजीन क्रमांक अस्पष्ट झालेला असल्याने त्या वाहन मालकांची अभिलेखावरुन ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांसमोर होते. पोलीसांनी प्रादेशिक परिवहन विभागातील अभिलेखावरुन प्राप्त माहितीच्या आधारे संबंधीत वाहन मालकांस नमूद वाहने ताब्यात घेण्यास अनेकदा कळविले असतांनाही ती वाहने संबंधीतांनी ताब्यात घेतली नाहीत.

            या मोटारसायकल पुन्हा वापरात न आनण्याच्या अटीवर एक गठ्ठा स्वरुपात एका खरेदीदारास भंगारसाठी विकण्यात आल्या असून 73 मोटारसायकलचा जाहीर लिलाव गेल्या सप्ताहात तर आज दि. 08.02.2022 रोजी 55 मोटारसायकलचा असा एकुण 128 मोटारसायकलचा जाहीर लिलाव करण्यात आला. यातून एकुण 3,62,500 ₹ रक्कम सरकारी तिजोरीत जमा झाली आहे.

रहदारीस धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

उमरगा : तुरोरी, ता. उमरगा येथील ग्रामस्थ- गोविंद पप्पु कोणे यांनी दि. 07.02.2022 रोजी 17.30 वा.सु. उमरगा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर आपल्या ताब्यातील ॲपे रीक्षा क्र. एम.एच. 25 एन 1032 हा रहदारिस धोकादायकपने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्यांच्याविरुध्द उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web