नळदुर्गमध्ये तलवार घेऊन फिरणाऱ्यास अटक 

 
crime

नळदुर्ग  : नळदुर्ग पो.ठा. चे पथक दि. 11.01.2023 रोजी 22.45 वा. सु. नळदुर्ग शहरातील गोलाई चौक रस्त्यावर रात्रगस्तीस असताना आष्टाकासार, ता. लोहारा येथील- राहुल कांत जाधव हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे अंदाजे 5.5 इंच गोल मुठ असलेली तलवार बेकायदेशीररीत्या हातात घेउन फिरत असताना पथकास आढळला. यावर पथकाने राहुल यास ताब्यात घेउन त्यांच्याजवळील ती तलवार जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


घाटांग्रीमध्ये  हाणामारी 

 उस्मानाबाद  : घाटांग्री, ता. उस्मानाबाद येथील- सुभाष सलगर, धनंजय सलगर, पुष्पा सलगर, आश्राबाई शिंदे यांनी दि.11.01.2023 रोजी 19.00 वा. सु. गावकरी- पंढरीनाथ भिमराव खांडेकर यांच्या घरासमोरील त्यांच्या मोटरसायकल जवळ विस्तव पेटवला होता. यावर पंढरीनाथ यांनी नमूद चौघांना त्याचा जाब विचारला असता त्यांनी संगणमताने पंढरीनाथ यांना लाथाबुक्यानी व काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. यात पंढरीनाथ यांच्या उजव्या हाताचे हाडमोडून ते जखमी झाले. अशा मजकुराच्या पंढरीनाथ खांडेकर यांनी दि. 12.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web