तुळजापूर येथील बेवारस मयताबाबत आवाहन

 
crime

उस्मानाबाद - तुळजापूर येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोहन जुमुनदार वय ५० वर्ष रा. तुळजापुर हा बेवारस आहे. त्याच्यावर  दि. 4 जून 2022 रोजी विषारी औषध प्राषण केल्याने तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर त्यांना उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयू वॉर्डात उपचार सुरू असतांना त्यांचा दि. 5 जून 2022 रोजी रात्री 8 वाजून 35 मिनिटाला मृत्यू झाला आहे. त्यानंतर येथील शहर पोलीस स्टेशन येथे आक्समिक मृत्यूची नोंद घेऊन मयताचे शवविच्छेदन करण्यात आले. मयताचे प्रेत येथील शीतगृहात दि. 10 जून 2022 पर्यंत ठेवून त्याच्या नातेवाईकांबाबत काही माहिती मिळून न आल्याने नगर परिषद येथील कर्मचा-यांनी त्याचदिवशी त्याची अंत्यविधी करण्यात आली आहे.

बेवारस मयत प्रेताचे वर्णन मरनोत्तर पंचनाम्याप्रमाणे पुढीलप्रमाणे आहे. मयत बेवारस नांव मोहन जुमुनदार, वय 50 वर्ष, रा. तुळजापुर. ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद. शरीर बांधा - मध्यम., उंची- 167 सेमी, रंग - सावळा, चेहरा - उभट, ओठ मध्यम, नाक सरळ, कपाळ - उतरते, डोक्याचे केस काळे पांढरे, आखुड, तिळ - गळयावर, कपडे - इटकरी रंगाचा फुल बाहयाचा नेहरु शर्ट व काळे पिवळसर रंगाची पँट, इटकरी, निळे भगव्या रंगाची अंडरविअर. अशा वर्णनाच्या बेवारस मयताची ओळख पटल्यास पो.स्टे. तुळजापुर येथे कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

From around the web