उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य आणि जुगार विरोधी विरोधी कारवाई
उस्मानाबाद - अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 20.10.2022 रोजी 11 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 15 लि. द्रव पदार्थ पोलीसांनी जागीच ओतून नष्ट करुन देशी दारुच्या 33 बाटल्या व सुमारे 171 लि. गावठी दारु असे मद्य जप्त केले. या नष्ट केलेल्या गावठी दारुच्या द्रव पदार्थासह जप्त मद्याची एकुण अंदाजे 21,960₹ किंमत असून छाप्यादरम्यान संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे गुन्हे नोंदवले आहेत.
1) मुरुम पो.ठा. च्या पथकाने तीन ठिकाणी छापे टाकले. यात सुंदरवाडी ग्रामस्थ- सतिश बनसोडे व दिलीप कुंभार हे दोघे 20.20 वा. सु. सुंदवाडी गावात दोन ठिकाणी एकुण 31 लि. गावठी दारु बाळगलेले, तर भोसगा ग्रामस्थ- बापुसाहेब कागे हे 11.55 वा. सु. आष्टामोड येथील एका बेकरीच्या बाजूस 26 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.
2) ढोकी पो.ठा. च्या पथकाने जागजी गावात दोन ठिकाणी छापे टाकले. यात जागजी ग्रामस्थ- पांडुरंग हिंगे व विनायक इंगळे हे दोघे 15.30 वा. सु. गावातील सुंबा रस्त्यालगत व आरणी रस्त्यालगत अनुक्रमे 40 लि. व 35 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.
3) कळंब पो.ठा. च्या पथकाने डिकसळ शिवारात 12.30 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- हिराबाई काळे या आपल्या घरासमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला 15 लि. द्रव पदार्थ बाळगलेल्या असताना आढळल्या.
4) तामलवाडी पो.ठा. च्या पथकाने पांगरधरवाडी गावात 15.30 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- नागनाथ क्षिरसागर हे आपल्या घरामागे 14 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.
5) उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकाने उस्मानाबाद येथील अजिंठा नगर येथे 14.20 वा. सु. छापा टाकला असता तेथे भिमनगर येथील- संदीप चव्हाण हे 15 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.
6) भुम पो.ठा. च्या पथकाने पारधी पिढी, आरसोली येथे 17.45 वा.सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- आशाबाई काळे या राहत्या परिसरात 10 लि. गावठी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.
7) लोहारा पो.ठा. च्या पथकाने खेड, ता. लोहारा येथे 16.30 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- चंद्रकांत बेलकुंडे हे आपल्या घरासमोर देशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.
8) येरमाळा पो.ठा. च्या पथकाने उपळाई गावात 20.00 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- नवनाथ मुंढे हे आपल्या घराजवळ देशी दारुच्या 18 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.
जुगार विरोधी कारवाई
जुगार विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 20.10.2022 रोजी 09 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात आढळलेले जुगार साहित्यासह एक मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 10,380 ₹ चा माल जप्त करण्यात आला. यावरुन 10 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 09 गुन्हे खालीलप्रमाणे दाखल करण्यात आले आहेत.
1) उस्मानाबाद शहर पो.ठा. च्या पथकाने शहरात तीन ठिकाणी छापे टाकले. यात राघुचीवाडी येथील- श्रीकांत गायकवाड हे 15.50 वा. सु. इंदीरानगर परिसरात कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,050 ₹ रक्कम बाळगलेले, तर दर्गा रोड येथील- इसाखॉन पठाण हे 16.22 वा.सु. राहत्या परिसरात कल्याण मटका जुगार साहित्यासह 1,050 ₹ रक्कम बाळगलेले, तर सांजा वेस गल्ली येथील- समीर शेख हे 19.40 वा. सु. दर्गा चौकात मिलन नाईट मटका जुगार साहित्यासह 1,060 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.
2) तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने तुळजापूर शहरात दोन ठिकाणी छापे टाकले. यात तुळजाई नगर, तुळजापूर येथील- बाळु कावरे हे 17.30 वा. सु. दिपक चौक परिसरात कल्याण मटका जुगार साहित्यासह 1,200 ₹ रक्कम बाळगलेले, तर दयानंद नगर, तुळजापूर येथील- अनिकेत मिसाळ हे 19.30 वा. सु. घाटशिळ पार्किंग रस्त्यालगत मिलन मटका जुगार साहित्यासह 600 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.
3) नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने काटगाव येथे 13.00 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- धनराज पाटील हे गावातील बस स्थानक चौकातील एका पानटपरीजवळ कल्याण मटका जुगार साहित्यासह 980 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.
4) तामलवाडी पो.ठा. च्या पथकाने सावरगाव येथे 15.10 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- नागनाथ सातपुते हे गावातील बस स्थानक चौकात कल्याण मटका जुगार साहित्यासह 370 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.
5) उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकाने येडशी गावात 16.20 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- येडशी येथील सोनेगाव रस्त्यालगत कल्याण मटका जुगार साहित्यासह 1,470 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.
6) ढोकी पो.ठा. च्या पथकाने ढोकी गावात 14.30 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- सुखदेव ससाणे व इसाम वस्ताद हे दोघे गावातील तेर रस्त्यालगत एका गॅरेजजवळ कल्याण मटका जुगार साहित्यासह एक मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 2,600 ₹ चा माल बाळगलेले असताना आढळले.