उस्मानाबादेत गुटखा विरोधी कारवाई

 
crime

उस्मानाबाद : प्रविण कदम, रा. उस्मानाबाद व राम डोंबे, रा. बार्शी हे दोघे दि. 13 मे रोजी 20.15 वा. शहरातील एका पानटपरीत मानवी आरोग्यास धोकादायक असलेला व महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटखा या अन्न पदार्थ असा एकुण 5,29,482 ₹ चा गुटखा बाळगलेले उस्मानाबाद (श.) पोलीसांना आढळले. यावरुन पोलीस नाईक- दिलीप गीत्ते यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 328, 272, 273 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद जिल्ह्यात दोन चोऱ्या 

लोहारा  : वडगाववाडी, ता. लोहारा येथील इंडस कंपनीच्या भ्रमणध्वनी मनोऱ्याखालील खोलीतील अमार राजा कंपनीच्या 24 बॅटरी दि. 14 मे रोजी सकाळी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या सुरक्षा रक्षक- महादेव ढवण यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : येरमाळा येथील कोंडीबा वाघमारे हे दि. 04 मे रोजी येरमाळा- मिरज बस प्रवासात असताना त्यांचा स्मार्टफोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला आणि दि. 09 मे पर्यंतच्या काळात त्या स्मार्टफोन मधील वाघमारे यांच्या युपीआय खात्याद्वारे 58,160 ₹ रक्कम अन्यत्र स्थलांतरीत केली. अशा मजकुराच्या कोंडीबा यांनी दि. 14 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web