उस्मानाबादेत जुगार विरोधी कारवाई
उस्मानाबाद : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोनि- रामेश्वर खनाळ यांना दि. 13.09.2022 रोजी 17.00 वा. सु. गोपनीय खबर मिळाली की, उस्मानाबाद शहरातील भानुनगर येथे मुकेश तुकाराम हाजगुडे यांच्या पत्रा शेडमध्ये काही ईसम जुगार खेळत आहेत. यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 17.25 वा. सु. नमूद ठिकाणी छापा टाकला असता तेथे 1.गणेश शिवाजी सातपुते 2.दिनेश बळीराम गिराम 3.संजय नारायण रायबान 4.राहुल अर्जुन रायबान 5.अकबर रहीमतुल्ला शेख 6.मुकेश तुकाराम हाजगुडे 7.पंकज संभाजीराव भोसले, सर्व रा. उस्मानाबाद हे सर्व लोक तिरट नावाचा जुगार खेळत असताना आढळले.
त्यांच्याकडे जुगाराबाबत विचारणा केली असता सदर पत्रा शेडचे मालक मुकेश हाजगुडे हे असून तेच सदर जुगाराचा अड्डा चालवित असल्याचे समजले. त्यांच्याकडून जुगार साहित्यासह 04 दुचाकी वाहने, 06 मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 2,64,590 ₹ चा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,5 अंतर्गत आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक .नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोनि- रामेश्वर खनाळ, पोहेकॉ- जानराव, निंबाळकर, काझी, अरब, घुगे, पोना- कवडे, जाधवर, काकडे, पोकॉ- कोळी, आशमोड यांच्या पथकाने केली आहे.
जुगार विरोधी कारवाई
भूम : जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पो.ठा. च्या पथकाने दि. 13.09.2022 रोजी 16.00 वा. सु. भुम शहरात छापा टाकला. यावेळी भुम ग्रामस्थ- निलेश दत्तात्रय शेंडगे, निखील दत्ता साबळे, अमोल भिमराज अंधारे, राम मंगेश आसलकर हे चौघे गोलाई चौक, भुम रस्त्याजवळ तिरट जुगार खेळत असताना जुगार साहित्यासह 1,860 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.