उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार , अवैध मद्य विरोधी कारवाई

 
Osmanabad police

परंडा  : जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन परंडा पोलीसांनी काल दि. 20.02.2022 रोजी परंडा शहरात छापा टाकला. यावेळी परंडा येथील टपाल कार्यालयाजवळ परंडा ग्रामस्थ- अजय चौतमहाल, हुसैन शेख, महेंद्र बनसोडे, हनुमंत सोनवणे हे तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्यासह 3,900 ₹ रक्कम बाळगलेले असतांना पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रोख रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत परंडा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाया

तुळजापूर : तिर्थ (खु.), ता. तुळजापूर येथील राजा भोसले हे दि. 20.02.2022 रोजी 12.30 वा. सु. भातंब्री गाव शिवारात एका पत्रा शेडजवळ 20 लि. हातभट्टी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web