उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार  विरोधी कारवाई

 
crime

भुम  : पारधी पिढी, भुम येथील मच्छिंद्र शामराव पवार हे दि. 29 जुलै रोजी 12.45 वा. सु. भुम बस स्थानकामागील एका शेडसमोर सुरट जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,130 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना भुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

उस्मानाबाद : येडशी, ता. उस्मानाबाद येथील अमर भास्कर शिंदे हे दि. 29 जुलै रोजी 15.50 वा. सु. येडशी ग्रामपंचायतजवळील चौकात कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 840 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले.

ढोकी : ढोकी येथील रमेश त्रिंबक ठाकुरे हे दि. 29 जुलै रोजी 13.15 वा. सु. गावातील बस स्थानकाजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 5,110 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले.

उमरगा  : उमरगा येथील दत्ता रामराव मदने हे दि. 29 जुलै रोजी 18.00 वा. सु. कसगी गावातील एका दुध संकलन केंद्राजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 855 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

कळंब  : कसबा गल्ली, कळंब येथील शहाजी शंकर घुले हे दि.29 जुलै रोजी कळंब येथील बाजार मैदानात कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,040 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.

            यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक काद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web