कुंथलगिरीत मंदिरातील दानपेटी चोरुन नेण्याचा प्रयत्न

 
crime

 वाशी  : कुंथलगीरी येथील श्री. सिध्दक्षेत्र देवस्थान मंदीराच्या तीन दरवाजाचा कडी- कोयंडा व कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 23.10.2022 रोजी 19.00 ते दि. 24.10.2022 रोजी 07.00 वा. दरम्यान तोडून आत प्रवेश करुन मंदीरातील दानपेटी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या सुरक्षा रक्षक- सुभाष विलास रोकडे यांनी दि. 24.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380, 511 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी , नळदुर्ग येथे हाणामारी 

बेंबळी  : बेंबळी, ता. उस्मानाबाद येथील- श्वेता व सोमनाथ माने या दोघा पती- पत्नींचे दि. 21.10.2022 रोजी 19.30 वा. सु. राहत्या घरी भांडण चालू असताना नातेवाईक- शोभा होळकर यांनी श्वेता यांना चापटाने मारहान केली. तर बापु होळकर यांनी ठार मारण्याच्या उद्देशाने श्वेता यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला व सोमनाथ माने यांनी श्वेता यांना पेटवून दिले. अशा मजकुराच्या श्वेता माने यांनी दि. 24.10.2022 रोजी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 307, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : देवसिंगा (नळ), ता. तुळजापूर येथील- युवराज पाटील, धनराज पाटील, भगवंत पाटील, मल्लीनाथ बिराजदार, सुलेमान शेख, ईब्राहीम शेख, अभिषेक बिराजदार, अक्षय बिराजदार, आरमान शेख, तुळशीराम घोडके, सैफन शेख, हाजु शेख, रविकांत पाटील यांच्या गटाचा गावकरी- राजअहमद पठाण, दुल्हेखॉ पठाण, अहमद पठाण, नोहसिन पठाण, हैदर पठाण, महेबुब पठाण, रफिक पठाण, सिकंदर पठाण, नेहाल पठाण, हनिफ पठाण, जावेद पठाण, फरीद पठाण यांच्या गटाशी जुन्या वादावरून दि. 21.10.2022 रोजी 10.00 वा. सु. गावातील हनुमान मंदीरासमोर हानामाऱ्या झाल्या. यात दोन्ही गटांतील व्यक्तींनी परस्परविरोधी गटांतील व्यक्तींस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, चाकु, लोखंडी गज, दगड, काठीने मारहान करुन गंभीर जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या युवराज पाटील व सिकंदर पठाण या दोघांनी दि. 24.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 341, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे नळदुर्ग पो.ठा. येथे नोंदवले आहेत.


 

From around the web