उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई
उस्मानाबाद : अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकाने दि. 27.09.2022 रोजी हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले. यात बावी ग्रामस्थ- बाळासाहेब रंगनाथ वाघमारे हे 19.00 वा. सु. गाव शिवारातील राष्ट्रीय महामार्गालगत हॉटेल आमराईच्या बाजूला अंदाजे 560 ₹ किंमतीच्या 16 बाटल्या देशी दारु बाळगलेले, तर येडशी ग्रामस्थ- लता शहाजी पवार या 17.05 वा. सु. गावातील जुन्या रेल्वे स्थानक परिसरात अंदाजे 650 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.
उस्मानाबाद : आपसिंगा, ता. तुळजापूर येथील- दिपक नागनाथ गुरव हे दि. 27.9.2022 रोजी 13.23 वा. सु. तुळजापूर येथील आपसिंगा रस्त्यालगतच्या गणेश लॉजसमोर 180 मि.ली क्षमतेच्या 48 बाटल्या देशी दारु अंदाजे 2,496 ₹ किंमतीच्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आढळले.
लोहारा : होळी, ता. लोहारा येथील- वसंत किसन राठोड हे दि. 27.09.2022 रोजी 11.00 वा. सु. गावातील किसन राठोड यांच्या घरासमोर अंदाजे 1,120 ₹ किंमीच्या 180 मि.ली. क्षमतेच्या 14 बाटल्या देशी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.
वाशी : खैराटवस्ती पारधी पिढी, ता. वाशी येथील- फूलाबाई आबा शिंदे या दि. 28.09.2022 रोजी 07.50 वा. सु. पारधी पिढी येथील आपल्या शेतात गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 90 लि. द्रव पदार्थ व 10 लि. गावठी दारु असा एकुण 6,640 ₹ चा माल बाळगलेल्या असताना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळल्या.
यावरुन पोलीसांनी गावठी दारु निर्मीतीचा द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करुन अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात स्वतंत्र 5 गुन्हे नोंदवले आहेत.
जुगार विरोधी कारवाई
ढोकी : दत्तनगर पारधी पिढी, ढोकी येथील- बालाजी भिमा काळे हे दि. 27.09.2022 रोजी 16.15 वा. सु. ढोकी येथील आठवडीबाजारात सुरट मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 480 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मद्यपी चालकावर गुन्हा नोंद
उस्मानाबाद : नांदुर्गा, ता. उस्मानाबाद येथील- दिनेश बापु कोळगे यांनी दि. 27.09.2022 रोजी 23.45 वा. सु. उस्मानाबाद येथील सार्वजनिक रस्त्यावर बोलेरो वाहन क्र. एम.एच. 25 एएस 0502 हे मद्यधुंद अवस्थेत चालवून भा.दं.सं. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन आनंदनगर पो.ठा. चे पोलीस अंमलदार- अशोक बांगर यांनी आज दि. 28.09.2022 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.