उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई

 
crime

उस्मानाबाद : अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद (श.) पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. 23.09.2022 रोजी उस्मानाबाद शहरात दोन ठिकाणी छापे टकले. यात वडरगल्ली येथील- तुमराज राजाभाउ देवकर हे 18.45 वा. सु. शहरातील आठवडा बाजार परिसरात अंदाजे 2,400 ₹ किंमतीची सुमारे 40 लि. गावठी दारु बाळगलेले, तर जुना बसडेपो, पारधी पिढी येथील- माधुरी अरुण काळे या 20.30 वा. सु. शहरातील साठे चौकात अंदाजे 2,400 ₹ किंमतीची सुमारे 30 लि. गावठी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.

वाशी  : घोडकी शिवार, वाशी येथील- गणेश राजाभाउ गपाट हे दि. 23.09.2022 रोजी 16.30 वा. सु. घोडकी शिवारातील हॉटेल रानवारा समोर अंदाजे 980 ₹ किंमतीच्या 180 मि.ली. क्षमतेच्या 14 बाटल्या देशी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.

परंडा  : डोमगाव, ता. परंडा येथील- इंबीराव संभाजी गायकवाड हे दि. 23.09.2022 रोजी 18.00 वा. सु. डोमगाव येथील एका पत्रा शेडमध्ये 180 मि.ली. क्षमतेच्या 13 बाटल्या देशी दारु व 10 लि. गावठी दारु असे एकुण अंदाजे 2,040 ₹ किंमतीचे मद्य अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.

नळदुर्ग  : नरखोरीतांडा, जळकोटवाडी, ता. तुळजापूर येथील- बाबु नाना राठोड हे दि. 23.09.2022 रोजी 18.00 वा. सु. राहत्या तांडा परिसरात अंदाजे 700 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.

यावर पोलीसांनी वरील पाचही छाप्यांतील अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.

 मद्यपी चालकावर गुन्हा नोंद

 ढोकी : तडवळे (क.), ता. उस्मानाबाद येथील- विशाल राजेंद्र बारबोले यांनी दि. 23.09.2022 रोजी 19.00 वा. सु. गावातील बस स्थानकाजवळील सार्वजनिक रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएन 2040 ही मद्यधुंद अवस्थेत चालवून भा.दं.सं. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन ढोकी पो.ठा. चे पोलीस अंमलदार- महेश शिंदे यांनी दि. 23.09.2022 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.

From around the web