उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई

 
crime

परंडा  : अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान परंडा पो.ठा. च्या पथकाने दि. 03 सप्टेंबर रोजी दोन ठिकाणी छापे टाकले. यात ईडा, ता. भुम येथील- गणेश शिवाजी घाडगे व बाबासाहेब जनार्धन खोगरे हे दोघे 17.15 ते 18.30 वा. सु. ईडा शिवारातील जवळा रस्त्यालगत दोन हॉटेलजवळ अंदाजे 3,440 ₹ किंमतीच्या 180 मि.ली. क्षमतेच्या अनुक्रमे 22 व 21 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना पथकास आढळले.

वाशी  : सरमकुंडी, ता. वाशी येथील- कल्याण रंगनाथ गायकवाड हे दि. 03 सप्टेंबर रोजी 16.10  वा. सु. सरमकुंडी येथील ‘सह्याद्री हॉटेल’ येथे अंदाजे 6,730 ₹ किंमतीचे देशी- विदेशी मद्य अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.

नळदुर्ग: नंदगाव, ता. तुळजापूर येथील- अफसर वाहीद शेख हे दि. 03 सप्टेंबर रोजी 17.30 वा. सु. नंदगाव बस थांब्याजवळील एका शेडसमोर अंदाजे 1,120 ₹ किंमतीच्या 180 मि.ली. क्षमतेच्या 16 बाटल्या देशी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.

उस्मानाबाद : घाटंग्री तांडा क्र. 1, ता. उस्मानाबाद येथील- सविता सुरेश चव्हाण ह्या दि. 03 सप्टेंबर रोजी 18.00 वा. सु. तांड्यावरील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 620 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या असताना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळल्या.     यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web